Wednesday 2 January 2013

फार  प्राचीन  काळापासून  वैदिक  काळातील  लोकांनी  संस्कृत  भाषेत  सुंदर  अशी  काव्यनिर्मिती  केली  होती,
वेद ग्रंथाची  निर्मिती  करणारे  म्हणून  त्यांचा  संस्कृतीला  " वैदिक  संस्कृती"असे म्हणतात ...
ऋग्वेद  हा  त्यांचा  पहिला  ग्रंथ   होय . ऋग्वेदानंतर  यजुवैद , सामवेद , अथर्ववेद हे  तीन  वेद  रचले  गेले ..

सामवेद : ऋग्वेदातील  काव्याचे  तालासुरात  गायन  कसे  करावे  याचे मार्गदर्शन  सामवेदात  केलेले आहे ..
सामवेद  हा  भारतीय  संगीताचा  पाया  मनाला  जातो .. आणि  सामवेद  ला मानणारे  लोक  म्हणजे  सामवेदी  ब्राह्मण  होय ..


सामवेदी   ब्राह्मणाचा  इतिहास  खालील  प्रमाणे  आहे..

वसई  मध्ये  प्रमुख  ६ समाज  होते   १) भंडारी  २) कोळी  ३) सामवेदी ४)पालशे ५)आगरी  ६) जास्त  करून  वाडवळ समाजाचे लोक होते..


वरील सगळ्या  समाजातील  अर्धे  लोक  इ .स .१५७० ला ख्रिश्चन  मध्ये विलीन  केले  गेले  पोर्तुगीजा कडून...
सामवेदी  हा शब्दः संस्कृत शब्दः "शामानीद्रेश"  पासून घेतला गेला... या शब्दःचा अर्थ  पूर्वी राजाकडे करमणूक  करणारे थोर  सेवक असा आहे...


पूर्वी राजा अशा लोकांना समाधी ठिकाणी  संगीत  गांण्यास  नेमणूक करायचे ... यास "समाधी " किवा "शामेडी " असे म्हणत असत...
पूर्वी समाधीचे ठिकाणी  म्हणजे  आताचे  जगदगुरु शंकराचार्य समाधी  मंदिर  निर्मळ , तसेच श्री सुरेश्वर( सुलेश्वर ) मंदिर , आणि भवानी शंकर मंदिर आगाशी...

कुलदेवता : कुलदेवता प्रामुख्याने  मातृदेवता भुवनेश्वरी आणि विमला... या देवताचे  प्रामुख्याने उत्काला येथे  वास्तव्य असे . " उत्काला " म्हणजे आता चे ओरिसा...

इतिहास :
 बस्सेईन चा इतिहास त्रेता युगा  पासून आहे ...बस्सेईन ( किवा  वसई किवा ओप्पिरे किवा ओर्पारक किवा शुरपारका असे काळानुसार  संबोधित  केले  जायचे )
भगवान परशुराम(  भगवान विष्णूचा १०वा  अवतार ) याने  बनवली  होती... भगवान परशुराम यांनी विमलेश्वर  मंदिर  आणि विमला सरोवर स्थापना केली ..

सामवेदी, बुद्ध इरा  इ.स.पूर्व. १५०० ला  ओर्रिसा मधून निपूर्ण  संगीतकार माणून शुर्पारक (बस्सेईन / वसई ) ऐथे आले ...आणि बुद्धिस्त  सत्येचा  वेळी वेदिक धर्मं  संपूष्टात आला जवळजवळ  इ.स.पूर्व. ४९७ला आद्य  शंकराचार्य जेव्हा आले तेव्हा बुद्धिस्त चा पराभव झाला आणि ते पुन्हा  वेदिकला  परत  गेले ....


गौतम बुद्ध चे अनुयायी  हे  वसई ..(आधी "शूर्पारक ") चे होते .....या आधी जे  बुद्धीस्त वेदिक  धर्म धर्माला मानत होते  ते सुद्धा वसई सोडून गेले ....

या नंतर कलिंगा  चा  राजा जलौक ( सम्राट  अशोक  का  चा  मुलगा ) याने जगत गुरु शंकराचार्या  यांना इस्टर्न  भारतातून येथे आणले ..
ते ५वे शंकराचार्या  होते  पूरी  नाव स्वामी विद्यारण्य ... व नंतर  स्वामी विद्यारण्य यांनी  उरलेले  बुद्धिस्त याचा पराभव केला....


नंतर  खूप वय  झाल्या  मुळे जगद्गुरू स्वामी  विद्यारण्य यांनी निर्मळ  येथील विमलेश्वर मंदिरात कार्तिकचा  ११ व्या  दिवशी इ.स.पूर्व. ४०४ ला महासमाधी घेतली....
तेवा राजा जलौक  यांनी ओर्रिसा शिल्पशास्त्र  नुसार  एक मोठी समाधी बांधली ..शंकराचार्य  हे  भगवान वल्लभा  याचे  शिष्य  होते ...नंतर भगवान कृष्ण याचे  मंदिर  बांधले गेले  समाधी चा समोर,
त्या नंतर काश्मिरी ब्राह्मण समजतील लोक  निर्मळ ला राहू लागली .त्या नंतर ३८व्या  जगत गुरूशंकराचार्य  स्वामी श्रीवनंदा सरस्वती यांनी भेट दिली सत्वाहन  राजा  राज्या  करत असतांना ...


त्या  नंतर पुरी  चा  राजा  भीमसेन क्षत्रियया  ना  वेगळे करत असताना १०६व्या  जगत गुरु शंकराचार्य स्वामी सुखबोध  तिथ यांनी वसई  ला १३व्या शतकात  आगमन केले ..
 या  नंतर या ठिकाणा ला  १३व्या  शंकराचार्य श्रीन्गेरी शारदा पीथम यांनी  भेट  दिली ... व  त्याची  समाधी हम्पी  कर्नाटका  येथे आहे ...

त्या नंतर स्वामी विद्यारण्य ( स्वामी पदामंभा तिथं ) याचा शिष्या  ची विजय यात्रा चालू असताना ७व्या  जगत गुरु  शंकराचार्य गोवर्धन पुरी  हे वसई  ला विजय यात्रा चालू असताना आले ....

इ .स. १५४३ला  पोर्तुगिज नि बस्सेईन   वर राज्य  करायला सुरवात केली ..... आणि वसई  येथील धर्मांचा  नायनाट  करायला  सुरवात केली ..
पोर्तुगिज नि  पद्मनाभा  स्वामी  याचे चे  हिलोच्क  येथील  मंदिर , मन्जे  आता चे  "निर्मळ  नाका " उद्धवस्त  करून  टाकले ...

तेव्हा  ब्रम्हींस ,शामेडीस , भंडारी ,जे जगत गुरु शंकराचार्य  यांना आपले धर्म गुरु मनात होते ते खूप दुखी झाले पोर्तुगिज चा  या कायद्यांनी ....
त्यांनी पद्मनाभा  स्वामी समाधी ची दगडे  आणली  आणि विद्यारण्य स्वामी चा मंदिरा चा समोर आणून ठेवली
 

या काळात  जवळ जवळ  २०० धार्मिक स्थळे उद्धवस्त  करून  टाकले  आली  बस्सेईन(वसई ) मध्ये ...
नंतर   वसई  चा  लोकाच्या सगण्या  वरून  पेशवा  चिमाजी आपा यांनी पोर्तुगिज वर हल्ला  केला आणि वसई  ला स्वातंत्र  केले १८व्या शतकात .....व नंतर   चिमाजी आपाच्या  विनंती  वरून स्वामी विद्या शंकरा भारती जे करवीर संकेश्वर याचे  ८वे  वंशज  होते ..


ते  जगत गुरु शंकराचार्य  यांचे  शिष्य  सुद्धा  होते यांना वसई  येण्यास विनंती केली ...स्वामी विद्या शंकरा भारती यांचा सल्या नि चिमाजी आपा यांनी ओर्रिसा  शिल्प शास्त्र  नुसार ,
स्वामी विद्यानार्या आणि स्वामी पद्मनाभ तीर्थ , ५वे  & ७वे  पुरी  पीठम  चे शंकराचार्य ..यांची समाधी  दुरुस्त  केली ...

स्वामी  विद्या शंकरा भारती यांचा मार्गदर्शना खाली  चिमाजी आपा पेशवे  यांनी  पेशवा बाजीराव  यांचा  सल्यानी १ कोण्कानास्था ब्राह्मण ,१ कार्ह्डे ब्राह्मण ,१देवरुखे ब्राह्मण
आणि ४-५ शुक्ला यजुर्वेदी गुजराथी ब्राह्मण यांची या भागात नेमणूक  केली ....
त्या वेळेला  फक्त ७-८ घरेच होती सोपारा भागात ब्राह्मण यांची ...


इ .स .१९२६ ला स्वामी भारती कृष्ण तीर्थ  १४३वे  जगत गुरु शंकराचर्या गोवर्धन पीथम पुरी चे याचे आदरानी नालासोपारा स्तनाकावर  स्वगत करण्यात आले ..
प्रसिद्ध  श्री शेमेडी वझे  यांनी जगत गुरु  यांनी स्वागत समिती  चे अध्यक्ष  बनवले .. नंतर  जगत गुरु नि विमालेश्वेर  सरोवरात  स्तान  केले व नंतर सुलेश्वेर मंदिरात दर्शन केले
आणि श्री विमालेश्वेर मंदिरात , आणि व नंतर स्वामी विद्यारण्य आणि स्वामी पद्मनाभ तीर्थ  यांचा समाधी  चे दर्शन घेतले ..


सामवेदी  हा  एक भारतीय  समाज आहे ,त्याचे  मुळचे काम  शास्त्रीय  संगीत आणि  नृत्य कलाकार असे होते ...ते  सामवेदा ला मानणारे होते ,माणून  त्यांना  सामवेदी ब्राह्मण मनात ...त्ये  मुळचे  ओरिसा  चे  नायक आणि गायक  होते ,..त्ये  निर्मळ चा  सरोवरा  येथील  १२ गावात राहत होते...   म्हणजे बस्सेईन (वसई ) चे .....
पूर्वीचे शूर्पारक  म्हणजे  आता चे सोपारा ...बुद्ध काळात  सामवेदी  निपूर्ण  कलाकार माणून आले होते  उत्काला  येथून   म्हणजे  आता चे ओरिसा ....काही इतिहासकारांच्या  मते  सामवेदी  इ .स १८२५ ला वसईत आले ..


परंतु सामवेदी  वसईत  पेशवाचा आधी  आले असा  लिखित पुरावा  किवा  सांस्कृतिक  पुरावा  नाही आहे..
या व्यवसाय  शी निगडीत  सामावेदाची ७ आडनावे आहेत  जी महाराष्ट्रातील  आगरी समाजशी मिळते जुळती आहेत .. तसेच  आगरी आणि कुपारी  सामवेदी चे  उप भाग आहेत ..


१)जी  वयक्ती  नाटकात  अभिनय करते आणि  कविता लिहिले  त्याला" नायक" म्हणतात ..नंतर त्याचा  कुटुंबाला  "नाईक " या  आडनावाने  ओळखू लागले ...


२) जे  संगीतकार   ब्राँझ आणि ब्रास या पासून बनवलेली  वाद्य  वाजवत  त्यांना "वर्तकः"म्हणत,.नंतर त्याचा  कुटुंबाला  "वर्तक  " या  आडनावाने  ओळखू लागले ..


३)  नाटकातील मुख्य  गायक  आणि मुख्य अभिनेता   यास "महापत्र " म्हणत,.नंतर त्याचा  कुटुंबाला  "म्हात्रे   " या  आडनावाने  ओळखू लागले ..


४)संगीत   मैफिली चे  समालोचन  करणारा ला "वाचे  "म्हणत,.नंतर त्याचा  कुटुंबाला  "वझे " या  आडनावाने  ओळखू लागले ..


५) अभिनेत्य ची   मुखरंग रंगोटी  करणारा ला "पात्तोलिका "म्हणत,.नंतर त्याचा  कुटुंबाला  " पाटील " या  आडनावाने  ओळखू लागले ..


६)तसेच देशमुख  हे सुद्धा   आडनाव  येते   सामवेदी  मध्ये ...

या ७ आडनावा  चा  लोक ची  पुढील  गोत्रे आहेत


१)भारद्वाज


२)कश्यप


३)अत्री


४)कौशिक


५)वशिष्ठ


६)अंगिरसा


तसेच  या सामवेदी  ब्राम्हण  समाजाची  पुढील प्रमुख  गावे  आहेत..


१)भुईगाव


२)वाघोली


३)कोफराड


४ गास


५) उमराळे


६) बोळींज


७)गावधनी


८)वटार


९)वाळून्जे


१०)वंडा( मर्देस )


११)पढाई

१२)करमाळे


१३) नावळे


१४) सोमाडी


१५) बानकर


१६) मांडपे

आणि या सगळ्या गावात  समान  अशी " कादोडी " भाषा  बोलण्यात  येते. आणि हि एकदम  कमी  सामवेदी ब्राह्मण लोकांकडून बोलण्यात  येणारी  भारतातील  भाषा  आहे...
तसेच  सामवेदी ब्राह्मण लोकांची लोकसंख्या' दिवसान दिवस वाढतच  आहे....


या  ब्लॉग  वर  प्रथमच  अशा  प्रकारे  आपल्या या सामवेदी  ब्राह्मण समाजा बद्दल माहिती  देण्याचा छोटासा प्रयत्न मी केला आहे....


काही  चुकीची  माहिती  आढळून  आल्यास आल्यास  माफी  असावी ..आणि कृपया  ती निदर्शनास आणून द्यावी ...
                                                                                                   
                                                                                                 आपला  नम्र ,
                                                                                               अभिषेक नाईक
                                                                                                   (कोफराड)